क्रीडा

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अभियानाला मिळाला लोकांचा पाठिंबा, एका दिवसात जमले रु. 3.6 कोटी

Virat Anushka Raises Funds for Covid 19 with Ketto | Aapli Mayboli

आयपीएल 2021 (IPL 2021) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे,  त्यामुळे सर्व खेळाडू आपापल्या घरी पोहचले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सुद्धा आपली पत्नी अनुष्का शर्मा सोबत घरी पोहचला आहे. मात्र, यावेळी विराट ने विश्रांती घेण्याऐवजी देशाची सेवा करण्याचा निर्धार केला आहे.

देशात, जेथे कोविड -१९ च्या नवीन प्रकरणांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड पुन्हा मोडले आहेत. त्याचवेळी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आता जनतेच्या मदतीसाठी पुढे आले आहेत आणि ते दोघे देशासह एकत्रितपणे हे युद्ध लढत आहेत.

कोरोनाविरूद्ध मैदानात उतरले विराट-अनुष्का
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांनी देशात सुरू असलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून दोन कोटी रुपये दिले आहेत. सात कोटी रुपये उभे करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. हे दोघे केटो (Ketto) या सामाजिक संस्थेमार्फत सर्वसामान्यांकडून हे पैसे गोळा करीत आहेत.

24 तासांत जमले रु. 3.6 कोटी
दरम्यान, विराटने सांगितले आहे की 24 तासांपेक्षा कमी कालावधीत 3.6 कोटी रुपयांची रक्कम उभी केली गेली आहे. एका ट्विटमध्ये विराटने म्हटले आहे की, ’24 तासांपेक्षा कमी वेळात 3.6 कोटी! या प्रतिसादामुळे खूश आहे. आमचे लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या देशाची मदत करा. धन्यवाद. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केटो मोहीम सुरू केली आहे जी सात दिवस चालवली जाईल. यातून जमा झालेला निधी ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या एसीटी ग्रांट्स या संस्थेला देण्यात येईल.

विराट-अनुष्काने पुढे केला मदतीचा हात
याआधी शुक्रवारी विराट कोहलीने शुक्रवारी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो म्हणाला होता, ‘आपला देश या क्षणी कठीण अवस्थेतून जात आहे. अधिकाधिक लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्या देशातील सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गेल्या एक वर्षापासून लोकांचे दु: ख पाहून मी आणि अनुष्का दुखावले आहोत.’

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here