आरोग्य

थंडीत सर्दी, खोकला यांवर घरगुती उपाय व काळजी

Simple Homemade Remedies for Cold and Cough in Winters | Aapli Mayboli

हिवाळ्यात गारवा जास्त प्रमाणात वाढल्याने सगळीकडे सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचे प्रमाण देखील वाढते. बरं सर्दी झाली की फक्त सर्दी इथं पर्यंतच मर्यादित न राहता त्यासोबत, घसा दुखणे, घसा खवखवणे, खोकला येणे, नाक गळणे, डोकं दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे, कणकणी, ताप येणे असे त्रास उदभवतात. सर्दी संसर्गजन्य रोग आहे. एक व्यक्तींपासून दुसऱ्या व्यक्तीला सर्दी लगेच पसरते. व्हायरस पासून साधारण सर्दी होण्याची शक्यता असते.

सर्दी, खोकला ही लक्षणे आठवडाभर आढळून येतात. डॉक्टर कडून औषधोपचार केले तरी हा त्रास आठवडाभर राहतोच. मुळात केवळ सर्दीवर स्पेशल औषध उपलब्ध नाही. डॉक्टर कडून जी औषधे दिली जातात त्यातून ताप, कणकणी, डोकं दुखणे हे त्रास कमी होतात. सर्दी बरी होण्यास बराच कालावधी लागतो. सर्दी शरीरातील काही संस्थांवर परिणाम करते. म्हणून सर्दी वर वेळीच प्रतिबंध आणणे गरजेचे आहे.

डॉक्टरांच्या औषधोपचारासोबत काही घरगुती उपाय सर्दी, खोकल्यावर प्रभावी ठरतात व सर्दीपासून लवकर सुटका होण्यास मदत होते. सर्दी पासून बचाव करण्यासाठी काही खास उपाय :- (simple homemade treatments for cold and cough in winters in marathi)

वाफ घेणे

सर्दीमुळे नाक चोदले जाते. श्वास घेताना त्रास होतो. डोकं दुखते. अशा वेळी नाक मोकळे होण्यासाठी डॉक्टर कडून देखील वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. ही वाफ घेणे म्हणजे केवळ गरम पाणी करून वाफ घेणे नव्हे तर पाणी उकळून त्यात विक्स , हळद, निलगिरी तेल किंवा इतर बाम टाकून वाफ घेऊ शकता. वाफ घेतल्यामुळे कोरडी सर्दी पातळ व्हायला मदत होते. छातीत साठलेला कफ लवकर बाहेर पडण्यास मदत होते. नाक मोकळे होते.

गरम वाफ घेतल्यामुळे डोक्याला, शरीराला आराम मिळतो. श्वासोच्छ्वास प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. वाफ घेणे सर्दीवर गुणकारी उपाय आहे. दिवसातून किमान दोन ते तीन वेळा अशी वाफ घेतल्यास लवकर आराम मिळतो. सर्दीपासून लवकर सुटका करून घ्यायची असेल तर वाफ जरूर घ्यावी.

हळदीचे दूध

गरम दुधात हळद घालून चांगली मिसळून कोमट दूध प्यावे. यामुळे घास दुखणे, घसा खवखवणे, खोकला असे त्रास कमी होण्यास मदत होते. हळदीच्या गरम दुधामुळे घशाला आराम मिळतो. हळदीमध्ये अँटी बॅक्टेरिअल गुण असल्याने सर्दी व खोकल्यावर हा रामबाण उपाय आहे. लहान मुलांनाही सर्दी, खोकला झाला की हळदीचे दूध द्यावे.

आलं – मध रस

आलं म्हणजे अद्रक सर्दी खोकल्यावर खूप औषधी आहे. आले खिसून घेऊन तयारीला रस काढावा. या रसामध्ये १ चमचा मध टाकून हे मिश्रण प्यावे. जरा तिखट चव लागली तरी यामुळे घशाला खूप आराम मिळतो. खोकला लवकर बरा होतो. हे मिश्रण दिवसातून किमान तीन वेळा तरी नक्की घ्यावे.

आल्याचा चहा

सर्दी खोकला झाल्यावर आलं बारीक करून किंवा खिसून घ्यावे. गरम पाण्यात किंवा दुधात टाकून ते उकळावे. चहा पावडर , साखर हवी असल्यास टाकणे किंवा तसाच हा चहा घेतला तरी सर्दी, खोकला पासून लवकर आराम मिळतो.

लसुण

लहान मुलांना सर्दी झाली की लसणाची माळ करून त्यांचौ गळ्याभोवती बांधावी असे म्हणतात. याचे कारण म्हणजे लसूण मध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी फ़ंगल, अँटी वायरल गुण असतात. लसूण केवळ लहान मुलांना नाही तर मोठ्या माणसांनाही सर्दी खोकल्यामध्ये खूप फायदेशीर ठरतो. लसूण पाकळ्या तुपात भाजून खाव्या किंवा एक कप पाण्यात लसूण, आले, ओवा उकळून हा काढा कोमट असतानाच प्यावा. यांमुळे सर्दी, खोकला लवकर बरा होतो.

तुळस

आयुर्वेदात तुळशीला खूप महत्व आहे. तुळस जशी पवित्रतेचे प्रतीक मानले जाते तशीच औषध म्हणूनही तिचे अनन्य साधारण महत्व आहे. तुळशीची पाने, आलं, पुदिन्याची पाने एक कप पाण्यात उकळून काढा करावा. हा काढा गरम असतानाच प्यावा जेणेकरून घसा शेकला जाऊन त्याला आराम मिळतो. तुळशीच्या औषधी गुणांमुळे खोकला सरशी पासून लवकर आराम मिळतो.

लिंबू मध

लिंबू व मध एकत्रित घेतल्याने शरीराला याचे खूप फायदे होतात. सर्दी खोकल्यामुळे त्रस्त असल्यावर एक चमचा मधात एक चमचालिंबाचा रस मिसळून गरम पाण्यात घालून प्यावा. सर्दी खोकल्यापासून लवकर आराम पडतो.

या घरगुती उपायांसोबतच सर्दी, खोकला झाल्यावर स्वतःची काळजी घेणेही आवश्यक आहे. त्यासाठी :-

१) सर्दी झाल्यावर गर्दीत जाणे टाळावे.
२) स्वछता पाळावी.
३) गरम पाणी प्यावे.
४) थंड पदार्थ, शीतपेये पिणे टाळावे.
५) हिवाळ्यात थंडीपासून सरंक्षण करण्यासाठी स्वेटर, कानटोपी, मफलर यांचा वापर करावा.
६) उन्हात जाणे टाळावे.
७) धुळीत जाऊ नये.
८) जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी पदार्थांचे सेवन करावे.
९) सूप, चहा अशा गरम पदार्थाचे सेवन करावे.
१०) नेहमी हायड्रेटेड राहणे गरजेचे असल्याने जास्तीत जास्त पाणी प्यावे.
११) कँफिनयुक्त आणि अल्कोहोल युक्त पदार्थ टाळावे.

हिवाळ्यात किंवा इतर कधीही सर्दी, खोकला आजार झाल्यावर वरील घरगुती उपाय केल्यास व योग्य ती काळजी घेतल्यास या आजारांपासून लवकरात लवकर आराम मिळेल. रोगप्रतिकारक शक्ती वाढविल्यास हे आजार वारंवार होणार नाहीत त्यामुळे पौष्टिक आहार घ्या, व्यायाम करा व निरोगी आयुष्य जगा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here