सामान्य ज्ञान

वाहन चालवताना या प्रकारे घ्या दक्षता

आपण प्रत्येकजण कधी ना कधी कोणतं ना कोणतं वाहन चालवत असतो. पण बर्‍याचदा असं होत की वाहन चालवताना काय दक्षता घ्यायची असते हे बर्‍याच लोकांना माहीत नसतं आणि त्यामुळेच आपले खूप मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हाला जर वाटतं असेल की आपले कोणत्याच प्रकारचे नुकसान होऊ नये तर मग वाहन चालवताना खालील प्रकारे दक्षता घ्या आणि आपले होणारे नुकसान टाळा :

  1. वाहन चालवण्याचा परवाना असेल तरच वाहन चालवावे, तसेच ज्या वाहनाचा परवाना आहे त्याव्यतिरिक्त दुसरे वाहन चालवू नये.
  2. नेहमी वाहन चालू करण्यापूर्वी वाहनाचे इंधन, ब्रेक आणि इतर आवश्यक पार्ट तपासून पहा.
  3. केव्हाही वाहन चालवताना रस्त्यावर चालणारी माणसे, मुले आणि प्राणी यांना सुरक्षित ठेऊन वाहन चालवावे. त्यांनी आपल्याला पहिले असल्यामुळे ते बाजूला होतील असे मानू नये.
  4. कधीही रागात, आवेशात, उन्मादात वा नशेत वाहन चालवू नये.
  5. ज्या वेळी तुम्ही वाहन चालवणार आहात त्यावेळी कोणाशीही वायफळ बोलू नये, तसेच धूम्रपानही करू नये.
  6. वाहन नेहमी डाव्या बाजूने चालवावे. तसेच इतर वाहनांशी शर्यत लावू नये.
  7. वाहन ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेगाने चालवू नये. कारण वेगात असलेल्या वाहनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण असते.
  8. जे वाहन आपण चालवत आहात त्यापेक्षा मोठे वाहन मागून आल्यास आपले वाहन थोडे रस्त्याच्या डावीकडे घ्यावे.
  9. आपल्या पाठीमागून रुग्णवाहिका, पोलिस वा लष्करी वाहन, अग्निशामक वाहन यापैकी कोणतेही वाहन येत असेल तर त्या वाहनाला पुढे जाऊ द्यावे.
  10. शाळा, रुग्णालय, चौक, वळण, पूल, रेल्वे क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर, पाणी साचलेला रस्ता अशा ठिकाणी वाहन सावकाश चालवावे.
  11. प्रत्येक वेळी वाहन वळवताना वाहनाचा वेग कमी ठेवावा.
  12. वाहन चालवताना रस्त्याच्या कडेला असलेल्या पोस्टर साईन बोर्ड आणि इतर अनावश्यक घटनांकडे लक्ष देऊ नये.
  13. वाहन चालवता त्यावेळी शकुन-अपशकुनाचा विचार करू नये. उदा. मांजर आडवे गेल्यास अचानक ब्रेक लावू नये.
  14. गर्दीच्या मार्गावर वाहन कुशलतेने सावकाश चालवावे. तसेच स्वत:च्या वाहनाच्या वर्गाच्या परिघात येणार्‍या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाचा वेग समजून घेऊन वाहन चालवू नये. कारण बहुतेक अपघात मोकळ्या रस्त्यावर वेगाने वाहन चालवल्यामुळेच होत असतात. तसेच बहुतेक अपघात मानवी चुका व उपेक्षेमुळेच होत असतात. ते टाळण्यासाठी वाहन चालवताना वरील सांगितल्या प्रमाणे दक्षता नक्की घ्यावी.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here