तंत्रज्ञान

नासा आता करणार चंद्र आणि मंगळ ग्रहावर शेती

NASA Space Agency USA | Aapli Mayboli

नासा अर्थात National Aeronautics and Space Administration (NASA) ही अमेरिकेची अवकाश संस्था सध्या अंतराळातील कृषि प्रकल्पावर काम करत आहे. जर्मनीतील अंतराळ संघटना देखील या योजनेवर नासा सोबत काम करत आहे. मोहिमेअंतर्गत प्रथमतः या योजनेस अनुकूल असणारे पृथ्वीवरील प्रदेश जसं कि अंटार्टिका येथे विविध प्रकारच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

भविष्यात हा प्रकल्प पृथ्वीच्या पलीकडे मनुष्याचं अस्तित्व स्थापित करण्यास मदत करेल. यापूर्वी देखील नासा च्या विविध प्रकल्पांनी शेतीला व कृषी उद्योगाला वाढण्यास मदत केली आहे. व्हर्टिकल फार्मिंग हे प्रगत कृषी प्रणालीच एक उल्लेखनीय उदाहरण आहे. एवढेच नाही, तर व्हर्टिकल फार्मिंग ही एक बहु-अब्ज डॉलर उद्योगात विकसित झाली आहे. आता नासाचे नवीन ध्येय आहे “स्वायत्त ग्रीन हाऊसेस बनविणे”. एक अशी शेती पद्धती ज्या मध्ये कोणत्याही शेतकऱ्यांना काम करण्याची आवश्यकता असणार नाही.

विविध देशातील अवकाश संघटनांनी अनेक दशकात नव-नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. प्रगत कृषी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण म्हणजे “इनडोअर फार्मिंग” आणि आता जर्मन अंतराळ संघटना व नासा प्रयत्न करत आहेत की, विना माती काम कसे करता येईल.

यासाठी अंटार्टिका मधील एका ग्रीन हाऊस मध्ये विविध चाचण्या व काम सुरू आहे. लवकरच एक अशी कृषी प्रणाली येईल जेथे शेती तर असेल पण शेतकर्‍यांचे कष्ट मात्र वाचतील. अर्थातच यामध्ये रोबोट महत्वपूर्ण भूमिका बजावतील. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल.

शेवटी मुद्दा हा आहे कि आपल्याला म्हणजेच मनुष्याला पृथ्वीच्या पलीकडे चंद्रावर किंवा मंगळावर शेती करता येईल की नाही आणि करता येईल तर कशी? या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील लवकरचं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here