क्रीडा

मिताली राज १०,००० धावा बनवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली

मिताली राज १०,००० धावा बनवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली

३८ वर्षीय अनुभवी फलंदाज मिताली राजने शुक्रवारी नवा इतिहास रचला. मितालीने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये आपल्या १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय आणि दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.

याआधी केवळ इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सने ही कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात मिताली राजने ३६ धावांच्या खेळीत २८ व्या षटकात एने बोश च्या चेंडूवर चौकार मारत हे यश संपादन केले. मात्र, यानंतर, पुढच्या चेंडूवर ती बाद झाली. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये तीने १०,००१ धावा केल्या आहेत. मिताली राजने वनडेमध्ये सर्वाधिक ६९७४ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७००० धावा करणारा ती पहिला महिला क्रिकेटपटू होण्यापासून अवघ्या ३६ धावा दूर आहे. त्याचबरोबर ८९ टी -२० सामन्यांत तीने २३६४ धावा केल्या आहेत. मितालीने १० कसोटीत ६६३ धावा केल्या आहेत.

सर्व दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा

मितालीच्या या कामगिरी चे दिग्गजांनी कौतुक केले आणि तीचे अभिनंदन केले. क्रिकेटचा देव आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाले, मितालीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. मितालीने ही मोठी कामगिरी आहे. अशीच वाटचाल करत रहा. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले आहे की, मितालीचे १०,००० धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू झाल्याबद्दल अभिनंदन. आपण केवळ खेळाचे महान राजदूत आणि दिग्गज नाही तर आपण पिढीला खेळामध्ये येण्यास प्रेरित केले आहे. तुझा अभिमान आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून मितालीच्या या कामगिरीचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू होण्याची ही खूप मोठी कामगिरी आहे.

311 व्या सामन्यात रचला इतिहास

मिताली राजने तिच्या 311 व्या सामन्यात ही कामगिरी केली. १९९९ मध्ये एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या मितालीने विक्रमी ७५ अर्धशतके आणि आठ शतके ठोकली आहेत. यापैकी तीने एकदिवसीय सामन्यात 54 अर्धशतके आणि ७ शतके ठोकली आहेत. इंग्लंडविरुद्ध 2002 मध्ये टॉटेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात मितालीने एकमेव शतक (214 धावा) केले आहे.

इंग्लंडच्या शार्लोटच्या नावावर आहेत सर्वाधिक धावा

महिला क्रिकेटमधील सर्वाधिक धावा इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सच्या नावावर असून तीने 10,273 धावा केल्या आहेत. 2016 मध्ये आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम घेणार्‍या या माजी महिला क्रिकेटपटूने १९१ एकदिवसीय सामन्यात ५९९२ धावा, २३ कसोटी सामन्यात १६७६ धावा आणि 95 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2,605 धावा केल्या आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here