राजकीय

महाराष्ट्रातील लॉकडाउन 15 जून पर्यंत वाढला, पण काही ठिकाणी मात्र शिथिलता

Lockdown Extended - Aapli Mayboli

कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे म्हणून काही ठिकाणी नियमांमध्ये शिथिलता देऊन 15 जून पर्यंत महाराष्ट्रातील लॉकडाउन वाढवला आहे.

सोशल मीडिया च्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधून लॉकडाउन वाढविण्याबाबतची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाउन 15 जून पर्यंत वाढला आहे हे आता स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात तसेच देशात थैमान घालत असलेला कोरोना विषाणू ची साथ ही कोणतीही सरकारी योजना नाही त्यामुळे कोणीही रस्त्यावर उतरू नये असे बोलत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सर्व आवश्यक वस्तु आणि सेवांची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संगितले की सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू असलेली सर्व आवश्यक वस्तु आणि सेवांची दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तसेच सर्व आवश्यक वस्तु आणि सेवांची दुकाने शनिवार व रविवार बंद राहतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संगितले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here