सामान्य ज्ञान

इंटरव्ह्यू दरम्यान या दहा गोष्टी करूच नका

Interview Tips | Aapli Mayboli

इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखतीला जाताना काय करायचं, कशी तयारी करायची याची भली मोठ्ठी यादी तुम्हाला जो तो सांगत असेल. कोणते कपडे घाला, कसं बोला, इ.

पण आता इंटरव्ह्यू देताना काय करायचं नाही याविषयी थोडी माहिती घेऊ.

उशीर कधीही करू नका

इंटरव्ह्यूला कधीही उशीर करू नका. त्यातून काही अपरिहार्य कारणानं उशीर होणारच असेल तर तसं कळवा. काहीही न कळवता उशीरा गेलात तर आपलं पहिलं इंप्रेशनच वाईट होईल हे लक्षात ठेवा.

नोकरी साठी हात पसरू नका

आपल्याला नोकरीची गरज आहे हे खरं आहे पण म्हणून समोरच्याकडे हात पसरण्याची गरज नाही. आपल्यातल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. लाचारीचा सूर चुकूनही आपल्या बोलण्यात यायला नको. एक लक्षात घ्या की जशी आपल्याला नोकरीची गरज असते तशीच कंपनीलाही चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करणार्‍या कर्मचार्‍यांची गरज असते.

तयारी न करता जाऊ नका

इंटरव्ह्यूला तयारी न करता कधीच जाऊ नका. आपण ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देणार आहोत त्या कंपनीबद्दलची माहिती आपल्याजवळ असायलाच हवी. तसचं आपल्या विषयातली इत्थंभूत आणि अप टू डेट माहितीही आपल्याजवळ हवी.

वायफळ चर्चा करू नका

आपलं काम नक्की काय असणार आहे याचा अंदाज न घेताच चर्चा करू नका आणि समोरच्या व्यक्तीला उगाच कोणती आश्वसनंही देऊ नका.

जुन्या कंपनीबद्दल वाईट बोलू नका

आपण ज्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी जाणार आहोत ती कंपनी किती चांगली आहे हे सांगण्याच्या नादात अनेकदा जुन्या कंपनीला नावं ठेवली जातात. ही गोष्ट कळत-नकळतपणे होऊ शकते. असं चुकूनही करू नका. तुमच्या जुन्या कंपनीबद्दल वाईट बोलण्यामुळे तुमच्या मुलभूत प्रामाणिकतेबद्दल आणि निष्ठेबद्दल शंका घ्यायला तुम्हीच जागा निर्माण करून देता हे विसरू नका.

चुकीची माहिती सांगू नका

इंटरव्ह्यू देताना ज्या गोष्टी आपल्याला सांगव्याशा वाटत नाहीत त्या आपण सांगितल्या नाही तरी चालतं, पण स्वत:बद्दल, स्वत:च्या कामाबद्दल, अनुभवांबद्दल कधीही चुकीची माहिती देऊ नका.

जास्तीच्या पैशांसाठीच नोकरी बदलत आहे असं भासवू नका

पैशासाठीच आपण नोकरी बदलत असू आणि नव्या ठिकाणी चार पैसे जास्त मिळत असल्यामुळेच इंटरव्ह्यूला जाणार असू तरी इंटरव्ह्यू देताना तसं भासवू नका. इंटरव्ह्यू घेणार्‍या व्यक्तीला तुम्ही फक्त पैशामागे लागला आहात असं वाटलं तर तुमच्याजवळ आलेली चांगली संधी तुम्ही गमावून बसू शकता.

न घाबरता प्रश्न विचारा

इंटरव्ह्यूच्या वेळी इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारायची मुभा देईल. तेव्हा न कचरता प्रश्न विचारा. प्रश्न न विचारणं म्हणजे तुम्हाला स्वत:चा विचार नसणं असं गृहित धरलं जाऊ शकतं.

राग, संताप व्यक्त करू नका

इंटरव्ह्यूच्या वेळी एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही, आवडली नाही किंवा कशावरून मतभेद झाले तरी आपलं म्हणणं आपण शांतपणेच मांडायला हवं. आपल्या आवाजात आणि शरीर भाषेत कुठेही राग, संताप दिसायला नको.

आभार मानायला विसरू नका

इंटरव्ह्यू झाल्यावर तिथून निघताना आभार न मानता निघणं असभ्यपणाचं मानलं जातं. त्यामुळे निघण्यापूर्वी आभार माना आणि 24 तासांच्या आत आभार मानणारी एक ईमेल संबंधित कंपनीला करून टाका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here