आरोग्य

मधुमेह असणार्‍या लोकांसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स

Important Tips for Diabetes People | Aapli Mayboli

साखरे नेहमीच गोड असते असं नाही. रक्तातल्या साखरेचं घ्या ना वाढलेली साखर आपल्याला कायम गोड खाण्यापासून थांबवु शकते. बैठी जीवनशैली व जंक फूड चे अतिसेवन आपल्याला मधुमेहग्रस्त करू शकतात. याचसोबत व्यायाम न करणे हे देखील एक कारण ठरू शकते. रक्तवाहिन्यांमधील वाढलेली साखर पुन्हा आटोक्यात आणायला फार कष्ट घ्यावे लागतात. तरी,अशा काही लहान-सहान गोष्टी आहेत ज्यांच्या कडे लक्ष देऊन आपण मधुमेहावर नियंत्रण आणू शकता. ते म्हणतात ना तूप खाऊन लगेच रुप येत नाही, हेही तसंच काहीतरी आहे.

आज आम्ही आपल्या सोबत शेअर करणार आहोत मधुमेहींसाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स. तत्पूर्वी आपण याची नोंद घ्यावी की आपल्या आरोग्याविषयीचे कोणतेही निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. कोणाच्याही आरोग्यास काही हानी झाल्यास “आपली मायबोली” जबाबदार असणार नाही.

चला तर मग पाहूया काय आहेत साखर नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त टिप्स:-

योग्य व्यायाम :- आपले आरोग्य राखण्यात व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मग ते चालणे असो किंवा धावणे किंवा जोर-बैठका व इतर व्यायाम करणे. मधुमेहामध्ये पण हीच गोष्ट लागू पडते जर आपल्याला साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर दिवसातून एक तास तरी चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे. आपण आवडीप्रमाणे इतर व्यायामही करू शकता.

नियमितपणा :- आपण आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा, इतर कामाच्या वेळा पाळायला हव्यात. सगळ्यात महत्त्वपूर्ण हे आहे की खाण्या पिण्याची वेळ चुकू देऊ नये.

चहाचे सेवन टाळावे :- मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी चहाचे सेवन कमीत कमी करावे, शक्यतो टाळावे. कारण चहाचे सेवन केल्यास आपल्या रक्तातली साखर वाढू शकते व ही वाढलेली साखरेची मात्रा घातक ठरू शकते.

बेकरी प्रोडक्ट्स टाळावे :- ब्रेड, खारी, टोस्ट, व पाव अशा अनेक गोष्टी असतात ज्यामध्ये आरोग्याला हानी पोहचेल असे काही घटक असतात. जसे की, यीस्ट, ज्याचे अतिसेवन आपल्याला लठ्ठपणा कडे घेऊन जाऊ शकते. या व्यतिरिक्त बेकरी मधील पदार्थ मैदयापासून बनवलेले असतात. मैदा हा पचायला जड असतो व त्याचे रूपांतर अतिरक्त चरबी मध्ये होऊ शकते.

तर वरील काही गोष्टी आहेत ज्या अमलात आणून आपण मधुमेहावर मात करू शकता. शेवटी काय तर तुम्हाला प्रयत्न करायला हवेत, प्रयत्ने अंती परमेश्वर हेच खरं…!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here