आरोग्य

गव्हांकुर – निसर्गाचं एक श्रेष्ठ वरदान

Importance of healthy wheat grass juice

गव्हांकुरांचा रस दूध, फळांच्या रसापेक्षा अनेक पट गुणकारी आहे. अंकुर चावून खाल्ल्यास दात व हिरड्या मजबूत होतात. कोणत्याही विकारात मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णास शक्तीसाठी गव्हांकुर रस देतात. गव्हांकुर रसाने डोळ्यांचे व केसांचे आरोग्यही सुधारते. पोटदुखी, अपचन, वात यावर तो गुणकारी आहे. त्वचेचे आजार या रसाने बरे होतात. कार्यशक्ती वाढते, थकवा येत नाही.

गव्हांकुर – निसर्गाचं एक श्रेष्ठ वरदान

गव्हांकुरांचा ताजा रस म्हणजे मनुष्याचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी निसगनि दिलेले एक श्रेष्ठ वरदान आहे. गव्हांकुर रसाचा प्रयोग वनस्पतिशास्त्रातील एक अत्यंत मोलाचा प्रयोग आहे. गव्हाच्या तृणात असणान्या रोगनिवारक शक्तीबाबत अजूनही सखोल संशोधन सुरू आहे. गव्हाच्या अंकुररसाने ३५० हून अधिक रोग बरे होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. जीवशास्त्रज्ञांनी यास ‘हरित रक्त’ म्हणून सन्मानित केले आहे. या रसात कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स, जीवनसत्त्वे व क्षार आहेत. गव्हांकुर रसात अद्भुत शक्ती आहे.

गव्हांकुराचं व्यावसायिक स्वरूप

गव्हांकुर रसातील हे गुणधर्म ओळखून काही शेतकरी, तसेच उद्योगप्रिय तरुण गव्हांकुराचे व्यावसायिक स्वरूपात उत्पादन घेत आहेत. पुण्यासारख्या शहरात ताजा गव्हांकुर रस सूर्योदयापूर्वी घरपोच देण्याचा व्यवसाय काही तरुण उद्योजक करत आहेत आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

घरच्या घरी बनवा ताजा गव्हांकुर रस

घरगुती स्वरूपातही गव्हांकुराचा प्रयोग करता येईल. त्यासाठी मातीच्या नऊ कुंड्या (प्लॅस्टिकच्या नकोत) किंवा मडकी घ्यावीत. त्यात खतमिश्रित माती घालावी. खत पूर्णतः कपोष्ट किंवा गांडुळखत असावे. रोज एका कुंडीत गहू पेरावेत. नऊ दिवसांत कुंड्या भराव्यात. कुंड्या उन्हात न ठेवता ल्या सावलीत ठेवाव्यात. त्यांना रोज पाणी द्यावे. नऊ दिवसांनंतर पहिल्या कुंडीतील गव्हांचे अंकुर कापून रस बनवून घ्यावा. गरजेप्रमाणे कुंड्या भरून गव्हांकुर उपयोगात आणावेत.

५ ते ७ इंच अंकुर औषधी गुणांनी परिपक्व असतात. अंकुर कापून, धुऊन, रस कापडात गाळून घ्यावा. रस ताजाच घ्यावा. प्रातःकाळी हा रस लाभदायक आहे. सर्वसाधारणपणे रोज सकाळी शंभर मिलिलिटर रस सूर्यप्रकाशाचा त्यावर परिणाम सुरू होण्याआधी प्राशन करावा. रस पिताना तो हळूहळू घुटका घेत प्राशन करावा. रस घेण्यापूर्वी वा घेतल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत काही खाऊ अथवा पिऊ नये. तसेच या रसामध्ये इतर कोणताही रस, साखर, मीठ मिसळू नये.

बहुउपयोगी गव्हांकुर रस

अलीकडे झालेल्या संशोधनावरून आयुर्वेदाच्या आधारे गव्हांकुरांचे भरपूर औषधी गुणधर्म आढळून आले आहेत. कर्करोगावर हे एक औषध म्हणून उपयुक्त आहे. गव्हांकुरात बहुमोल घटकद्रव्ये असतात. अत्यावश्यक जीवनसत्वे अ, ब, क व ई, भरपूर खनिजद्रव्ये, अत्यावश्यक अॅमिनो अॅसिड, तंतुमय घटक, अत्यावश्यक ओमेगा फॅटी अॅसिड गव्हांकुरात भरपूर प्रमाणात आढळतात. याशिवाय भरपूर फॉलिफेनॉल्स, अँटी ऑक्साईड्स व अँटी बॅक्टेरिअलचे खास गुणधर्म यात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, रक्ताचे शुद्धीकरण होते व हृदयाचे कार्य सुधारते. तसेच कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, मूत्राशयाच्या व्याधी दूर होतात.

निसर्गोपचार तज्ज्ञांच्या मते, गव्हाच्या रोपांच्या हिरव्या पात्यांतील ‘क्लोरोफिल’ म्हणजे एक संजीवनी आहे. मानवी रक्तातील हिमोग्लोबिनमधील ‘हेमिन’ व या वनस्पतीतील ‘क्लोरोफील’ यांच्यात बरेच साम्य आहे. ‘क्लोरोफील’च्या मध्यभागी असणारे मॅग्नेशियम शरीरातील साधारणतः तीस प्रकारच्या विकारांना आवश्यक असते. ‘क्लोरोफील’ हे एक प्रभावी जंतुनाशक आहे.

गव्हाच्या तृणरसाचा हा गुण लक्षात घेऊन अनेक वैद्यक चिकित्सकांनी पायोरिया, त्वचेचे रोग, मेंदूतील रक्तस्राव, क्षय, हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे काठीण्य, आतड्यातील सूज आदी व्याधींवर गव्हांकुर रसाचा उपयोग करून पाहिला आहे. गव्हांकुराचा रस प्राशन केल्याने ‘क्लोरोफील’चे रूपांतर हिमोग्लोबिनमधील हेमिनमध्ये होते. म्हणजे हिरव्या रक्ताचे रूपांतर लाल रक्तात होते. गव्हांकुर रस नियमित घेतल्याने कॅन्सर पेशींची वाढ होत नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गव्हांकुर रसातील ‘क्लोरोफील’ पूर्णपणे सुरक्षित व दुष्परिणामरहित आहे.

गव्हांकुर रसाचा वापर अँटिसेप्टिक म्हणून जखम धुण्यासाठी, त्वचारोगांवर बाहेरून लावण्यासाठीही होतो. सांधेदुखीमध्ये त्वचेला मसाज करण्यासाठी गव्हांकुराचा रस वापरतात. गव्हांकुर रसाचा प्रयोग आपल्याला घरगुती स्वरूपात करता येईल, तसेच एक व्यवसायसंधी म्हणूनही त्याचा विचार करायला हरकत नाही. फक्त त्यासाठी त्या संदर्भातील शास्त्रीय माहिती मिळविणे, तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

– महेंद्र फाटे

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here