आरोग्य

ताण तणाव दूर करण्याचे सोप्पे उपाय

जर तुमचे कोणत्याच कामात लक्ष लागत नसेल व एकटे पडल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही तणावाचे शिकार असू शकता. आजच्या धावपळीच्या जीवनात तणावाची समस्या सार्वत्रिक ठरली आहे. यामुळे अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते.

तणावातून मुक्त होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यासह खालील काही उपाय अवलंबून पहा :

१. फूड थेरपी : चिकित्सकांच्या मते, पोषकतत्त्वांनी परिपूर्ण पदार्थ खाण्यामुळे मनुष्याची ऊर्जा व मूडवर प्रभाव पडतो. त्यासाठी या काळात फळ व भाज्यांचे सेवन करा.

२. शॉपिंग : तणावावरून आपले लक्ष दूर करण्यासाठी शॉपिंग ला जा. आपल्या आवडीच्या काही गोष्टी खरेदी करा.

३. पाळीव प्राण्यांवर प्रेम करा : असं म्हणतात की, पाळीव प्राण्यांशी आपले ऋणानुबंध आपल्या जवळच्या नातेवाईकांपेक्षा कमी नसतात. जेव्हा तुम्ही तणावाखाली असाल अशा वेळी पाळीव प्राण्यांसोबत काही वेळ काढा. त्यांचा सहवास तुम्हाला तुमचा तणाव दूर करण्यास महत्त्वाचा ठरेल.

४. मुलांबरोबर खेळा : लहान मुले निरागस असतात. त्यांच्या बरोबर वेळ घालवल्यामुळे किंवा त्यांच्याशी खेळल्यामुळे तुमच्या बालपणातील अनेक किस्से तुम्हाला आठवतील. त्यामुळे नकळत मनावरील ताण तणाव कुठच्या कुठे निघून जाईल.

५. चित्रपट पहा : एक चांगला चित्रपट तुमचा तणाव दूर करण्याचा चांगला मार्ग आहे. चित्रपट पहायला जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर जा. तेथे तुम्ही तुमच्या आवडीचे स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स घेऊन चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे तुमचा तणाव दूर होण्यास मोठी मदत होईल.

६. चालणे : ताण तणाव दूर करण्याचा शांतपणे चालण्याइतका दूसरा कोणताही चांगला उपाय नाही. मोकळ्या हवेत, शांत वातावरणात मनसोक्त फिरण्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा खर्च होऊन मनातील राग आपोआप कमी होईल. त्यामुळे मनावरील ताण तणाव हलका होऊन शांत वाटेल.

७. संगीत ऐका : संगीत हे ताण तणाव दूर करण्याचे अतिशय चांगले औषध आहे. एखादे चांगले संगीत ऐकल्याने आपला ताण तणाव दूर होऊ शकतो.

८. मेडिटेशन : आपल्या दैनंदिन जीवनातील धावपळीमुळे आपल्याला स्ट्रेस जाणवतो. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरही आपले नियंत्रण राहत नाही. त्यासाठी मेडिटेशन हा चांगला उपाय आहे. आपल्याला थकल्यासारखे वाटत असेल तर ध्यान लावा. त्यामुळे तुम्हाला त्वरित अंतर्गत ऊर्जा मिळून ताजेतवाने झाल्यासारखे वाटेल.

९. व्यायाम : ताण तणाव असताना व्यायाम अजिबात चुकवू नका. चांगले वर्कआऊट केले असता व्यवस्थित भूक लागते. तसेच झोपदेखील चांगली लागते. यातून ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here