पाऊस पडू लागला की गरम कांदा भजी खाऊ वाटतातच पण ती तेवढीच आरोग्यदायी ही असायला पाहिजेत. म्हणून आज मी ओव्याची पाने आणि कांदा मिक्स भजी ची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पाऊस पडत असताना त्या आल्हाददायक वातावरणात आरोग्यदायी गरमा-गरम, स्वादिष्ट, रुचकर व चवदार भजी खाणे म्हणजे दुग्धशर्करा युक्त योगच म्हणावा लागेल.
आरोग्यदायी ओवायुक्त कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
-
- बेसन पीठ
- कांदा
- ओव्याची पाने
- तीळ
- बडीशेप
- चवीनुसार मीठ
- तिखट
- बारिक चिरलेली कोथिंबीर
कृती : चला तर मग पाहूया आरोग्यदायी ओवायुक्त कांदा भजी कशी बनवायची ?
सर्वप्रथम आपल्याला बेसन पीठ घेऊन त्या मध्ये बारीक किंवा मोठा चिरलेला कांदा टाकायचा आहे. त्यानंतर ओव्याची पाने घेऊन ती बारीक चिरून त्या पीठामध्ये मिक्स करायची आहेत. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ व तिखट टाकायचे आहे. तसेच तुम्ही या साहित्यामध्ये बडीशेप व तीळ पण काही प्रमाणात मिक्स करू शकता. तुम्हाला जर भजी एकदम कुरकुरीत करायची असतील तर या साहित्यामध्ये थोड तांदळाचे पीठ घालावे ज्यामुळे भजी कुरकुरीत होतात. तसेच या सर्व साहित्यामध्ये तुम्ही ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून कांदा भजी अजून चविष्ट बनवू शकता.
हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर कढईत तेल गरम करावे आणि भजी तळून घ्यावीत. अशा प्रकारे गरमा-गरम भजी तयार करून सर्व्ह करावीत. या साहित्यामध्ये असलेल्या बडीशेप, तीळ व ओव्याची पाने यामुळे पित्त होत नाही.
तर मग अशी ही गरमा-गरम व चविष्ट कांदा भजी घरी नक्की करून पहा आणि पावसाचा मनसोक्त आनंद घ्या.
– दीपिका जंगम.
Comment here