आपल्या शरीराला कायमच पाण्याची नितांत आवश्यकता असते आणि उन्हाळ्यामध्ये तर शरीराला खूप प्रमाणात पाणी लागतं. नियमित व पुरेसे पाणी पिण्यामुळे शरीराला होणारे फायदे खालीलप्रमाणे :
पचनक्रिया सुधारते
पचनक्रियेचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यामुळे गॅस, अपचन ऍसिडिटी यांसारख्या पोटाच्या लहान सहान तक्रारी दूर होण्यास मदत होते.
डोकेदुखी कमी होते
धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात डोकेदुखीचा त्रास जाणवतो. डोकेदुखीचा त्रास कमी करायचा असेल तर दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी पाणी पिणे फायदेशीर ठरते.
त्वचा नितळ व चमकदार बनते
शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा निस्तेज होण्यास सुरुवात होते. म्हणूनच नितळ त्वचेसाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते. यामुळे नवीन पेशी तयार होऊन त्वचा चमकदार बनते.
हृदय निरोगी ठेवते
हृदय निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. पाणी हे आपले रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते आणि हृदयाच्या कार्याला चालना देखील देते. पाणी हृदयाच्या सर्व कप्प्यांना निरोगी ठेवण्यास मदत करते.
Comment here