प्रेरणादायी

एलन मस्क यांच्या यशाचे नियम

Elon Musk Success Story

मित्रांनो एलन मस्क हे नाव तुमच्या सर्वांच्या परिचयाचे नक्कीच असेल यात शंका नाही. ते एक प्रसिद्ध व्यावसायिक तर आहेतचं शिवाय स्पेस एक्स या कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार कंपनी टेस्ला चे ते सीईओ आहेत.

खरंतर एलन मस्क हे यशाच्या शिखरावर आहेत पण त्यांना हे यश सहजासहजी मिळलेलं नाही. खूप कष्ट करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलेलं आहे. एलन मस्क यांना जेव्हा विचारण्यात येतं की तुम्ही हे यश कसं मिळवलतं ? तर ते यावर उत्तर देतात की यश मिळवण्याचे माझे काही नियम आहेत. चला तर मित्रांनो पाहुयात एलन मस्क यांच्या यशाचे नियम काय आहेत. (elon musk success tips)

कधीही हार मानू नका

मित्रांनो काहीही झालं तरी हार मानू नका. परिस्थिती कशीही असली, कितीही संकट आली तरी हिम्मत गमावू नका. आलेल्या परिस्थितीला मोठ्या धैर्याने सामोरे जा. आपल्या आयुष्यात आलेली संकट ही खरं तर आपली परीक्षा घेण्यासाठीच आलेली असतात. तेव्हा न घाबरता, न डगमगता आलेल्या संकटांना कसं परतवून लावायचं याचा विचार करा.

जे आवडत आहे तेच करा

तुम्हाला जे काम आवडत तेच करा. तुम्हाला ज्या कामात, ज्या क्षेत्रात रस आहे, आवड आहे, काम करायची इच्छा त्याच क्षेत्रात राहून तुमच्या आवडीचं काम करा. आपल्या आवडीचे काम असेल तर आपण नीट लक्ष देऊन अगदी मनापासून ते काम करतो आणि त्या कामातून मिळणारं समाधान पण वेगळंचं असतं. त्यामुळे इतर कोणीही तुम्हाला काहीही सांगेल की तू हे काम कर किंवा हे काम करू नको, अशा वेळी इतर कोणाचही न ऐकता तुम्हाला जे काम चांगलं वाटतं, जे काम आवडतं तेच करा.

रिस्क घ्यायला शिका

कोणतही काम करायच्या आधी जास्त विचार करत बसू नका. हे काम मला जमेल की नाही, या कामातून काही फायदा होईल की नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा रिस्क घेऊन ते काम करायला सुरुवात करा.

कठोर मेहनत करा

तुमची स्वत:ची स्वप्न पूर्ण करायची असतील तर कष्टाला पर्याय नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे, सातत्यपूर्वक काम करत रहा. कोणतही काम करायला लाजू नका. आज केलेले कष्ट तुमचं उद्याचं भविष्य घडवणार असतात. त्यामुळे जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनतीच्या जोरावर स्वत:ची स्वप्न पूर्ण करा.

अपयश पचवण्याची तयारी ठेवा

आज पर्यंत कोणालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळालेले नाही. रतन टाटा, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, इ. लोकांनी सुद्धा यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. त्यामुळे अपयशाला अजिबात घाबरू नका. अपयश हा काही गुन्हा नाही, त्यामुळे आलेलं अपयश पचवण्याची हिम्मत ठेवा. ते म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश का आल, आपण कुठे कमी पडलो याची कारणे शोधा आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करा.

उत्तम प्रॉडक्ट बनवा

तुम्ही जी काही उत्पादने किंवा सेवा देणार आहात त्या नेहमी उत्तमच असल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रीत करा. आपली उत्पादने किंवा सेवा वापरणारा ग्राहक हा नेहमी समाधानी असायला पाहिजे त्यामुळे त्या उत्पादनांचा किंवा सेवांचा दर्जा हा नेहमी चांगलाच असला पाहिजे.

महान लोकांच्या संपर्कात रहा

ज्या लोकांनी प्रामाणिकपणे कष्ट करून यश मिळवले आहे अशा यशस्वी लोकांच्या नेहमी संपर्कात रहा. जेव्हा कधी तुमची त्यांच्याशी भेट होईल तेव्हा त्यांच्याकडून काही ना काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या ज्या काही चांगल्या सवयी असतील त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा.

निगेटिव्ह लोकांचे ऐकू नका

आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोकं असतात जी आपल्याला सांगत असतात की तुला हे जमेल का, तू हे केल तर त्यामध्ये नुकसान होऊ शकत त्यामुळे तू हे करू नको, ते काही आपलं काम नाही आणि बरचं काही हे लोक बोलत असतात. काहीही झालं तरी अशा लोकांचं अजिबात ऐकायचं नाही. आयुष्यात जे ध्येय तुम्ही ठरवले आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत रहा

हुशार लोकांना जवळ करा

हुशार लोकांची जगात कमी नाही. स्वत:ची हुशारी वापरुन लोकांनी खूप काही गोष्टी साध्य केल्या आहेत. आपणही अशा हुशार लोकांना जवळ करून आपल्या आयुष्यातील ध्येय पूर्ण करू शकतो. जसं की आपण व्यवसाय सुरू केला असेल तर या हुशार लोकांच्या मदतीने आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो.

काहीतरी जगावेगळे करा

आयुष्य जगण्यासाठी, स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी आपण काही ना काही करत असतो. परंतु तुम्ही जे काही करणार आहात ते इतरांपेक्षा वेगळं करा. तुम्ही केलेलं वेगळंपण चार चौघात उठून दिसलं पाहिजे. त्यामुळे जे काही कराल ते जगावेगळं करा.

मित्रांनो, एलन मस्क यांचे हे यशाचे नियम तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील. आपल्या इकडे मराठी मध्ये एक म्हण आहे “प्रयत्न वाळूचे कण रगडता तेलही गळे”. त्यामुळे आयुष्यात नेहमी आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करा. (success rules of elon musk)

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.