पाककृती

चकोल्या – आजीची आठवण करून देणारा स्वादिष्ट पदार्थ

Chakolya Varanfal Recipe | Aapli Mayboli

खुप नशिबवान असतात ते लोक ज्यांची आजी असते, मायेने डोक्यावर हात फिरवणारी, आपल्याला हवं नको ते पाहणारी. अशीच माझीही आजी होती. मी लहान असताना मला काय हवं नको ते ती पहायची. मलाही तिच्या हातचे पदार्थ खायला खूप आवडायचं. चकोल्या माझ्या आवडत्या पदार्थांपैकी एक. काही ठिकाणी याला वरण फळ देखील म्हणतात. आज मी माझ्या आजीची चकोल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अतिशय कमी वेळात बनणारा व चटकन पोट भरणारा हा स्वादिष्ट, रुचकर व चवदार पदार्थ आहे.

चकोल्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

    • तूर डाळीचे वरण
    • फोडणीसाठी तेल
    • बारिक चिरलेली कोथिंबीर
    • लसूण
    • हिरवी मिरची
    • कढीपत्ता
    • जीरे-मोहरी
    • थोडीशी कणिक

कृती : चला तर मग पाहूया चकोल्या कशा बनवायच्या ?
सर्वप्रथम आपल्याला तूर डाळीच्या वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे. फोडणी तशीच द्यायची जशी आपण नेहमी फोडणीचं वरण करताना देतो. वरणाला उकळी फुटेपर्यंत कणकेचा गोळा घेऊन चपाती सारखा लाटावा. ही चपाती थोडी जाडसरच ठेवावी. त्यानंतर चपातीचे सुरीने कापण्यांसारखे काप करावे. आता हे कणकेचे काप उकळत्या वरणात सोडावे व झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवावे. वरण उतू जाणार नाही याची काळजी घ्यावी. पाच मिनिटानंतर वरणातील कणकेचे काप शिजले की नाही याची खात्री करावी व गॅस बंद करावा. शेवटी बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने सजवावे आणि गरम गरम खायला द्याव्या चकोल्या म्हणजेच वरण फळ.

हेही वाचा : ५ प्रकारचे पौष्टिक पराठे

जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 1999/- मध्ये

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here