आपल्या शरीराला चालण्याचे खूप फायदे आहेत परंतु ते आपणाला माहीत नसतात. चला तर मग पाहुयात की दररोज ३० मिनिटे चालण्याचे शरीराला कोणते ३० फायदे होतात. ते समजल्यावर तुम्ही पण दररोज चालायला सुरुवात कराल.
चालण्याचे शरीराला होणारे फायदे .
१. एक पैसाही खर्च न करता, केला जाणारा व्यायाम.
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार.
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार.
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवणारा एकमेव व्यायाम प्रकार.
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
६. चालण्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढीस लागते.
७. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले ‘डी’ जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
८. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
९. सतत काम करून तना-मनाला आलेला थकवा चालण्यामुळे दूर होतो.
१०. तणाव व चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते.
११. चालण्यामुळे झोप चांगली लागते.
१२. मन एकाग्र करण्यासाठी व चिंतनासाठी चालणे फायदेशीर ठरते.
१३. वजन कमी करण्यासाठी किंवा वजन वाढविण्यासाठी उत्तम व्यायाम.
१४. दररोज चालल्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जळतात.
१५. दररोज चालल्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.
१६. दररोज अर्धा तास चालल्याने संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
१७. पचनक्रिया सुधारते. मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१८. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व क्षमता वाढीस लागते.
१९. नियमित चालण्याची सवय असणार्यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते.
२०. पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब हे त्रास दररोज चालल्यामुळे कमी होतात.
२१. दररोज चालल्यामुळे श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२२. चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते.
२३. दररोज चालल्यामुळे हाडांची मजबूती वाढते.
२४. कंबर, मांड्या, पायाचे स्नायू दररोज चालल्यामुळे मजबूत होतात.
२५. मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
२६. काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
२७. दररोज चालल्यामुळे नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत होते.
२८. दररोज नियमित चालल्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्यासाठी वय आड येत नाही.
हेही वाचा : मुलायम केसांसाठी घरगुती हेअर मास्क
जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 1999/- मध्ये
Comment here