बायको कशी हवी? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक तरुणाच्या मनात थोडे का होईना पण ठरलेले असते | ती सुंदर असावी, मन मिळावू असावी आणि बरच काही | तो मनातल्या मनात आपल्या जोडीदाराची रूपरेषा बाळगत असतो, जी वेळ आली की कल्पना बनते। आज आपण असाच एका विषयावर बोलणार आहोत। लवकरच कलर्स मराठी वर नविन मालिका सुरू होत आहे, “बायको अशी हवी”. या मालिकेबद्दल आपण सविस्तर चर्चा करण्या पुर्वी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहुया.
कुठलंही नातं जोडण्या आधी, ती एक स्त्री असते. ती एक मुलगी, एक बहीण असते. लग्नानंतर ती पत्नी, आई, काकी, मामी अश्या अनेक भूमिका निभावत असते. हे बदल फक्त नाव किवा ओळख देत नाहीत. तर ही एक जबाबदारी असते. मुलीच्या जन्मापासून ते मृत्यु पर्यंत ती अनेक बदलांना सामोरे जात असते. मुलीच्या मनात सुद्धा आपल्या स्वप्नाच्या राजकुमाराची एक ओजस अशी प्रतिमा असते. तिच्या ही काही अपेक्षा असतात. आई-वडिलांचे घर सोडून नव्या आयुष्याची सोनेरी स्वप्न पाहत सासरी गृहप्रवेश करते. पण असं नाही की तिथे सगळे तिच्या माणसासारखं असेल.
अपेक्षा, स्वप्न आणि जबाबदारी
मुलगी सुंदर हवी, शिकलेली हवी अशी अपेक्षा तर सगळेच करतात. पण असे किती लोक असतात जे लग्नानंतर त्या मुलीला तिचे स्वप्न पुर्ण करु देतात? अगदी थोडे, बरोबर ना? लग्नानंतर मुलगा शहरात नोकरीला असेल तर, कुटुंबापासून दूर राहून, दोघांना नोकरी करण्याची संधी भेटते. पण शहरातले एकत्र कुटुंब असेल तर मात्र घराबाहेर पडणे अवघड होते. चुकुन वाकून सून कामासाठी घराबाहेर पडली, तर तिला घड्याळ्याच्या काट्यावर कसरत करावी लागते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामच-काम. हा, काही मुली असतात नशिबवान की त्यांना समजूतदार सासर मिळते. पण काही काळानंतर करियर वर लगाम लागते हे ही तितकेच खरे आहे.
लग्नानंतर नवरा, सासु,सासरे, मुलं या सगळ्यामधे तीच जगणं राहून जाते. शेवटी काय ऐकायला मिळतं – तु घरातलेच तर काम करते, त्यात काय एवढं अवघड आहे? सुखी संसाराची नथ मिरवणारी बायको, ती मनोमन झुरत राहते. एवढंच काय तर, लहानपणी पासुन एकच गोष्ट आपल्या मनावर रुजवली जाती- मुलीला काय शेवटी चूल आणि मूल सांभाळता आल म्हणजे झाल. आपली आई पण तेच करत आलेली असती.
पण हे सगळं अपेक्षांच ओझ मुलीच्या खांद्यावर का? कारण पुरुष हा बाहेर जाऊन पैसे कमवत असतो. ते तर स्त्री पण कमवते की, तरीही तिला घरकाम देखील पहावे लागते. हा फरक का? आणखी एक प्रश्न मला नेहमी खुणावत असतो. तुम्ही घरात सून आणायच्या आधी सगळे व्यवस्थित सुरू असत, मग एक व्यक्ती आल्याने अस काय बदलते. सगळी कामे जबाबदार्या का तिच्यावर सोपवण्यात येतात? कदाचित हीच रीत चालत आली आहे, हा वारसा आहे सासूने सुनेला दिलेला.
विचार तर करून पहा
या सगळ्या गोष्टींचा विचार केला मन अगदी भांबावून जाते. याच विचारसरणीला धरून कलर्स मराठी आपल्यासाठी एक नवीन मालिका आणत आहे. युरोपिया प्रॉडक्शन्स निर्मित मालिका बायको अशी हवी चे लेखन आणि दिग्दर्शन वीरेन प्रधान यांनी केले आहे.या मालिकेत मुख्य नायकाचे काम विकास पाटील करताना दिसतात, आणि नायिकेच्या भूमिकेत आहेत गौरी देशपांडे.
चला तर पाहुयात मालिकेच कथानक काय आहे
मालिकेच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर ही कथा आहे राजेशिर्के कुटुंबाची. भैय्यासाहेब राजेशिर्के हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व दर्शविले असून घराची व कारभाराची सर्व जबाबदारी भैय्यासाहेब यांचा मुलगा विभास निभावत आहे. एकंदरीत सर्व चित्र जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं या म्हणीला अनुसरून आहे. पुरुषांच्या वर्चस्वाची रीत जपत आलेल राजेशिर्के कुटुंब बाहेरून एकदम परफेक्ट वाटत. पण आपण मात्र गोष्ट काही वेगळीच आहे.
बायकांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावे बाकी गोष्टीत लक्ष घालू नये अशा विचारांवर चालणारे हे कुटुंब आहे. इथे बायकांना आपल्या मनातलं सांगण्याची देखील परवानगी नाही. या मालिकेत पुरुष प्रधान घरात एका स्त्रीची होणारी घुसमट पाहायला मिळते. घरातील इतर बायका जरी निमूटपणे सहन करत. पुरुष प्रधान राजेशिर्के कुटुंबाच्या विरुद्ध एका मध्यम व स्वतंत्र विचार असलेल्या कुटुंबात वाढलेली जान्हवी काय करेल जेव्हा तीच लग्न विभास सोबत होईल. लग्न आणि परिवाराबद्दल विरोधी मत असलेल्या विकास आणि जानवी चा संसार कसा असेल? त्यांची मन आणि मत कधी एकत्र येतील का?
हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका कलर्स मराठी वरील नवीन मालिका “बायको अशी हवी”.
येत्या सोमवारपासून रात्री 8:30 वाजता कलर्स मराठी वर आणि वूट ॲप वर.. बायको अशी हवी..!
Comment here