तुमच्या पैकी बर्याच लोकांना बर्याच वेळा होणारी गोष्ट म्हणजे ॲसिडिटी. ॲसिडिटी होण्याची मुख्य कारणे म्हणजे जेवण वेळेवर न करणे व झोपेच्या अनियमित वेळा. तसेच झोप कमी झाल्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते. ॲसिडिटीचा त्रास सुरू झाला की डोकेदुखी, कंबरदुखी, पोटदुखी, छातीत जळजळ यांसारखे आजार मागे लागतात. ॲसिडिटीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या घरीच करता येतील असे उपाय खालीलप्रमाणे :
१. पाणी
पाणी पिणे आणि ते योग्य प्रमाणात पिणे महत्त्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो. यासाठी दिवसभरात कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जर गॅसचा त्रास होत असेल तेव्हा पाणी घ्या. भरपूर पाणी प्या.
२. जिरे
जिर्यामुळे पाचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. म्हणून जेव्हा गॅसची समस्या असेल तेव्हा एक चमचा जिरे पावडर गार पाण्यात घोळून प्या, खूप फायदा होतो.
३. काळी मिरी
मिरी हे गॅस आणि ॲसिडिटीवर चांगले औषध आहे. जवळपास अर्धा ग्रॅम मिरीपूड मधातून घेतल्यास आराम मिळतो.
४. हळद
हळद सूज आणि बुरशीनिवारक गुणधर्माची आहे. अनेक आजारांवर हळद औषधांचे काम करते. गॅस आणि ॲसिडिटीच्या त्रासात थोडी हळद गार पाण्यातून घ्यावी आणि त्यावर दही किंवा केळ खावे.
५. नारळपाणी
नारळपाणी गॅसेस आणि ॲसिडिटी पासून आराम देणारे उत्तम औषध आहे. यात व्हिटॅमिन आणि पोषणतत्त्वे भरपूर असतात. पोटाच्या अनेक आजारांत नारळपाणी उत्तम उपचार आहे.
६. पुदिना
जर गॅस आणि ॲसिडिटीचा जास्त त्रास जाणवत असेल तर पुदिन्यामुळे लगेच बरे वाटते. पुदिन्याची काही पाने, चावून घ्या किंवा पुदिन्याचा चहा बनवून घ्या. गॅस व ॲसिडिटीपासून आराम मिळेल.
७. लवंग
लवंग ही गॅसेसच्या समस्येवर उत्तम औषध आहे. ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर तोंडात लवंग ठेवावी. काही क्षणांत बरे वाटायला लागते किंवा लवंग पावडर मधातून घेतल्याने त्रासातून लगेच आराम मिळतो.
८. पपई
पपईत बिटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असते. जेवण लवकर पचवणारी तत्त्वे पपईत आढळतात. पपईमध्ये पॅपिन नावाचे एन्झाइम असते. जे खूप फायदेशीर असते. गॅसेसचा त्रास होत असेल तर जेवण कमी करा आणि त्यानंतर काळे मीठ घालून पपई खा. बद्धकोष्ठता आणि गॅसेससारखा त्रास कमी होतो.
९. बटाटा
बटाट्यामुळे गॅसेसचा त्रास होतो असा समज आहे. मात्र बटाटा कसा खाल्ला जातो, ते महत्त्वाचे. बटाट्याच्या रसाने गॅसेस आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो. बटाटा ज्यूस उल्कलाई गुणधर्माचा आहे. कच्चे बटाटे सोलून पाण्यात टाकून मिक्सरमधून त्याचा ज्यूस करून घ्यावा. नंतर त्याला गाळून त्यात थोडे गरम पाणी मिसळून प्यावा, आराम मिळतो.
१०. आले
पोटाच्या अनेक विकारांवर आले खूप गुणकारी आहे. सुंठीच्या चहाने लगेच आराम मिळतो. आल्यात टिबॅक्टेरिअर आणि टिइंपलमेंटरी गुणधर्म आहेत. त्यामुळे पोट आणि अन्ननलिकेच्या झडपांतील अडथळे दूर होतात आणि गॅस मोकळा होतो. शिवाय आल्यामुळे पोटात गॅस निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. आल्याचा एक तुकडा तुपात भाजून त्यावर काळे मीठ लावून खाल्ल्याने गॅसेसचा त्रास लगेच कमी होतो. तसेच सुंठीचा काढाही अनेक आजारांवर फायद्याचा आहे.
Comment here