आरोग्य

मुलायम केसांसाठी घरगुती हेअर मास्क

Homemade Hair Mask for Silky and Soft Hairs | Aapli Mayboli

केसांचे सौंदर्य हा प्रत्येक मुलीचा, स्त्रीचा जवळचा विषय. आपले केस लांबसडक, काळेभोर, मुलायम, चमकदार असावेत असे प्रत्येक स्त्रीला वाटत असते. त्यासाठी बऱ्याच ट्रीटमेंट देखील घेतल्या जातात परंतु व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसे प्रत्येक व्यक्तीचे/ महिलेचे केस, त्यांची पोत, वाढ, रंग,प्रकार, आकार वेगवेगळे असते. काहींचे केस सिल्की, काळेभोर असतात तर काहींचे केस कुरळे, पिंगट, रफ असतात.

अलीकडे विविध उत्पादने वापरून बघण्यामुळे म्हणा किंवा प्रदूषणामुळे, वाढत्या ताणा मुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. धुळीमुळे केस रफ, कोरडे होतात. केसांमध्ये कोंडा होतो परिणामी केसगळती वाढते. केस मुलायम, रेशमी होण्यासाठी बाहेर हजारो रुपये घालवून ट्रीटमेंट घेतली जाते, मास्क लावले जातात पण तीही शंभर टक्के यशस्वी होतातच असे नाही.

कालांतराने त्याचेही दुष्परिणाम केसांवर दिसू लागतात. या समस्यांवर घरच्या घरी योग्य उपाय करून आयुर्वेदिक पद्धतीने तुमचे केस मुलायम, सिल्की आणि निरोगी ठेऊ शकता. अर्थात याचे दुष्परिणाम काहीही होत नाहीत. केस चमकदार व चांगले होण्यासाठी नैसर्गिक हेअर मास्क पाहूया:-

१) दही व लिंबू मिश्रण

केसांच्या समस्यांवर दही हे प्रभावी औषधासारखे काम करते. दह्यामध्ये पोषण तत्वे तर असतातच सोबत अँटी फ़ंगल गुणधर्म यात आढळून येतात. दह्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस मिक्स करावा. हे मिश्रण स्काल्पला लावून मालिश करावी. अर्ध्या तासानंतर केस कोमट पाण्याने धुवावे. दहीं मुळे केस मऊ व सिल्की होतात. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.

२) कोरफड केसांसाठी आवश्यक

कोरफड जेलही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम औषध हवं. दोन चमचे दही, एक चमचा कोरफड जेल, ऑलिव्ह ऑईल असे साहित्य एकत्र करून पेस्ट मुळापासून संपूर्ण केसांना लावावी. हलक्या हाताने मसाज करावा. ४५ मिनिटांनि केस माईल्ड शाम्पूने धुवावे.फक्त कोरफडीचा गर देखील या ठिकाणी वापरू शकता किंवा कोरफड गर आठवड्यातून एकदा केसांना लावून मालिश करून अर्ध्या तासाने केस धुवावे. या उपायाने केस मुलायम होतात.

३) दही व मध केसांसाठी गुणकारी

दही व मध यांमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्यामुळे केसांना यांच्या वापरामुळे पोषण मिळते व केस मऊ तसेच मजबूत बनतात. अर्धा कप दहीमध्ये २ चमचे मध मिसळून या मिश्रणाचा वापर केसांसाठी मास्क प्रमाणे करू शकता.हे मिश्रण केसांना मुळांपासून टोकापर्यंत लावावे. हलक्या हाताने मसाज करून अर्ध्या तासानंतर माईल्ड शॅम्पूने धुवावे.
हा प्रयोग आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा.

४) केळी उत्तम हेअर मास्क

फळ ही नैसर्गिक स्रोत असतात जी आपल्या शरीराला, शरीरातील अवयवांना पोषण देतात, निरोगी ठेवतात. केळी हे फळ बहुगुणी आहे हे सर्वांना माहीत आहेच. एक केळ घ्यावे किंवा केसांची लांबी लक्षात घेऊन जेवढे केळ लागेल तेवढे घ्यावे. स्मॅश करून हा हेअर पॅक केसांना मुळापासून टोकंपर्यंत लावावा. ३० ते ४० मिनिटे हा हेअर पॅक केसांना लावून ठेवावा. त्यानंतर कोमट पाण्याने माईल्ड शॅम्पूने केस धुवावे. कंडिशनर म्हणूनही केळ उत्तम काम करते. हा हेअर पॅक आठवड्यातून एकदा, दोनदा केसांना लावावा. केस मजबूत व मुलायम होतील.

५) कांद्याचा रस केसवाढीसाठी गुणकारी

कांदा हा केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरतो. सहज व नेहमी घरच्या घरी उपलब्ध होणारा कांदा केस वाढीसाठी हेअर ऑइल मध्ये वापरू शकता. कांद्याचा रस रोजच्या हेअर ऑईलमध्ये मिक्स करून त्याने केसांना मालिश करावी. तसेच हेअर पाक म्हणूनही कांद्याचा रस केसांवर जादू करतो. कांद्याचा तस, बदाम तेल, व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे सगळे एकत्र करून हेअर पॅक तयार करावा व केसांना मुळापासून सर्वत्र लावावा. ३० ते ३५ मिनिटांनी केस माईल्ड शॅम्पूने धुवावेत. केस नैसर्गिक रित्या सुकू द्यावेत. कांद्याचा रस आठवड्यातून एक ते दोन वेळा केसांना लावल्याने केसांमधील कोंडा नाहीसा होऊन केस वाढण्यास मदत होते तसेच केसांच्या इतर समस्या देखील दूर होतात.

केसांना वेळोवेळो तेलाने मालिश, उन्हापासून संरक्षण, केमिकल उत्पादनांपासून बचाव, कोमट पाण्याचा वापर, पौष्टिक आहार, भरपूर पाणी पिणे अशी बेसिक काळजी घेतल्यास देखील केस निरोगी राहतील. वरील हेअर पॅक, हेअर मास्क यांचा वापर नियमितपणे आठवड्यातून एकदा केल्यास केस मुलायम, रेशमी, चमकदार होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comments (2)

  1. […] हेही वाचा : मुलायम केसांसाठी घरगुती हेअर मास्क […]

  2. […] हेही वाचा : मुलायम केसांसाठी घरगुती हेअर मास्क […]

Comment here