अमेझॉन प्राईम वर लवकरच आपल्या भेटीला येत आहे एक हिंदी चित्रपट – “शेरणी“. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता ज्यामध्ये अभिनेत्री विद्या बालन या एका इंडियन फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत दिसून येत आहेत. संपूर्ण चित्रपट मनुष्य आणि वन्यजीव हे कसे एकमेकांवर अवलंबून आहेत यावर भर देत असल्याचे दिसते.
ट्रेलर मध्ये विद्याचे वेगवेगळे रुपं पाहायला मिळतात. एकीकडे ती समाज घटकांशी झुंज देत असते तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यात अनेक प्रश्नांना सामोरे जात असते. स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण आणि दहशत निर्माण केलेल्या, “त्या” नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाघिणीचा शोध घेत ही वन अधिकारी अव्वल भूमिका निभावते. दुसरीकडे जंगलाच्या आसपास राहणारे लोक आपल्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त करताना दिसतात.
अबुंदांत इंडिया इंटरटेनमेंट व टी सिरीज निर्मित शेरनी या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत (नाटक “न्यूटन” फेम) अमित मसुरकर . पडद्यावर खडतर अशा स्त्री भूमिका साकारण्यात प्रसिद्ध असणाऱ्या विद्याची ही आणखी एक शूर गाथा आहे. या प्रवासात तिची साथ देत आहेत विजय राज,विजेंद्र कला, मुकुल चड्डा,नीरज काबी, इला अरुण व इतर कलाकार.
शेरनी च्या विषयी बोलताना विद्या म्हणते ही गोष्ट पहिल्यांदा ऐकली तेव्हाच तिला खूप आकर्षक वाटली. हा चित्रपट खूपच नाजूक व संवेदनशील मुद्द्यावर आधारित आहे. फक्त मानव आणि प्राणी यांच्यातच नाही तर मनुष्या-मनुष्या मध्ये देखील परस्पर समज, सन्मान व सहजीवनाचा विषय आहे. हे अनोखं पात्र साकारण्याचा व ही कथा जगापर्यंत पोचवण्याची संधी तिला मिळाली याबद्दल विद्याने आनंद व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी लॉकडाऊन मध्ये प्रदर्शित झालेल्या शकुंतला देवी प्रमाणेच हा चित्रपट देखील ॲमेझॉन प्राईम वर प्रदर्शित होणार आहे. तर 18 जून रोजी पाहायला विसरू नका शेरनी – एका नरभक्षक वाघिणीच्या शोधात…!
Comment here