मनोरंजन

माधुरी दीक्षित यांनी यामुळे अनिल कपूर यांच्या सोबत काम करणे बंद केले

Madhuri Dixit Anil Kapoor | Aapli Mayboli

माधुरी दीक्षित यांनी अनिल कपूर यांच्या सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, पण एक वेळ अशी होती जेव्हा त्यांनी अभिनेत्यांबरोबर काम करण्यास नकार दिला होता.

बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित 15 एप्रिल रोजी आपला 54 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षित यांनी वयाच्या 15 व्या वर्षी पाऊल ठेवले, आपल्या अभिनय आणि नृत्याने त्यांनी लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. अनिल कपूर यांच्याबरोबर त्यांची ऑन स्क्रीन जोडी चांगलीच गाजली आहे. हेच कारण आहे की त्यांची जोडी 90 च्या दशकाच्या हिट जोड्यांपैकी एक होती.

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी बेटा, राम-लखन, तेजाब सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची पडद्यावर केमिस्ट्री जबरदस्त होती आणि असं असून देखील माधुरी यांनी अनिल कपूर यांच्या बरोबर काम करण्यास नकार दिला. त्यांनी अनिल कपूर यांच्या बरोबर यापुढे काम करणार नसल्याचे ठरवले. यामुळे चित्रपट सृष्टीत या दोघांबद्दल बर्‍याच गोष्टी उघडकीस आल्या.

अनिल कपूर यांच्या सोबत जोडलं गेल माधुरी दीक्षित हे नाव

माधुरी दीक्षित यांचे बहुतेक चित्रपट अनिल कपूर यांच्या सोबत आहेत. ही जोडी ब्लॉकबस्टर हिट होत होती आणि म्हणूनच या दोघांमध्ये चांगली मैत्री वाढली. मात्र काही लोक मैत्रीच्या या नात्यास प्रेम म्हणत होते.

अशा परिस्थितीत अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरची चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये होऊ लागली. रील लाइफ कपल लवकरच रिअल लाइफ कपल होणार असल्याची बातमी समोर आली. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांनीही अशा बातम्यांदरम्यान एकमेकांशी अधिक वेळ घालवायला सुरुवात केली. दोघेही सेटवर एकमेकांसोबत असल्याचे दिसून येत होतं. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यात सर्वकाही व्यवस्थित चालू होते.

जेव्हा अनिल कपूर यांची पत्नी सुनीता मुलांसमवेत सेटवर आल्या

सुनीता या अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्यातील कडवटपणाचं कारण असल्याचे म्हटले जात होतं. एक दिवस अनिल कपूर यांची पत्नी सुनीता मुलांसमवेत सेटवर पोहोचल्या. पत्नीला पाहून अनिल कपूर तिथे पोहोचले आणि त्यांच्याशी बोलू लागले, त्याचवेळी माधुरीही तिथून जात होत्या. अनिल कपूर यांना आपल्या कुटूंबासमवेत पाहून माधुरी दीक्षित यांनी ठरवले की त्या अनिल कपूर यांच्या पासून दूर राहतील आणि त्यांच्याबरोबर काम करणार नाही.

इतकेच नाही तर माधुरी दीक्षित यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की त्या असे काही करणार नाही जे अनिल कपूर यांच्या कुटुंबाचे नुकसान करेल. शेवटच्या वेळी दोघेही लज्जा या चित्रपटात दिसले, त्यानंतर अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी ब्रेक झाली. हे दोघे बर्‍याच वर्षांपासून एकमेकांच्या समोर दिसत नव्हते.

18 वर्षानंतर पडद्यावर दिसली माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी

टोटल धमाल या चित्रपटात माधुरी दीक्षित 18 वर्षानंतर अनिल कपूर यांच्या सोबत दिसल्या. या दोघांनी जवळपास एकमेकांसोबत 18 चित्रपट केले आहेत, म्हणूनच 18 वर्षांनंतरही या दोघांची केमिस्ट्री पडद्यावर शोभून दिसली. विनोदी चित्रपटातील या दोघांची ही जोडी लोकांना खूप आवडली होती, तरीही हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.

अनिल कपूर यांच्या बद्दल बोलायचे झाले तर ते माधुरी दीक्षित यांना एक चांगली मैत्रीण मानतात. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की जेव्हा जेव्हा शूटिंगला माधुरी उशिरा यायच्या तेव्हा ते नेहमीच त्यांची बाजू घेत असे. इतकेच नाही तर अनिल कपूर त्यांच्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यास शूट उशीरा किंवा आधी घेण्यास सांगत असे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here