आयपीएल 2021 (IPL 2021) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे, त्यामुळे सर्व खेळाडू आपापल्या घरी पोहचले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सुद्धा आपली पत्नी अनुष्का शर्मा सोबत घरी पोहचला आहे. मात्र, यावेळी विराट ने विश्रांती घेण्याऐवजी देशाची सेवा करण्याचा निर्धार केला आहे.
देशात, जेथे कोविड -१९ च्या नवीन प्रकरणांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड पुन्हा मोडले आहेत. त्याचवेळी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आता जनतेच्या मदतीसाठी पुढे आले आहेत आणि ते दोघे देशासह एकत्रितपणे हे युद्ध लढत आहेत.
कोरोनाविरूद्ध मैदानात उतरले विराट-अनुष्का
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांनी देशात सुरू असलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी मदत म्हणून दोन कोटी रुपये दिले आहेत. सात कोटी रुपये उभे करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. हे दोघे केटो (Ketto) या सामाजिक संस्थेमार्फत सर्वसामान्यांकडून हे पैसे गोळा करीत आहेत.
24 तासांत जमले रु. 3.6 कोटी
दरम्यान, विराटने सांगितले आहे की 24 तासांपेक्षा कमी कालावधीत 3.6 कोटी रुपयांची रक्कम उभी केली गेली आहे. एका ट्विटमध्ये विराटने म्हटले आहे की, ’24 तासांपेक्षा कमी वेळात 3.6 कोटी! या प्रतिसादामुळे खूश आहे. आमचे लक्ष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि आपल्या देशाची मदत करा. धन्यवाद. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी केटो मोहीम सुरू केली आहे जी सात दिवस चालवली जाईल. यातून जमा झालेला निधी ऑक्सिजन व इतर वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्या एसीटी ग्रांट्स या संस्थेला देण्यात येईल.
विराट-अनुष्काने पुढे केला मदतीचा हात
याआधी शुक्रवारी विराट कोहलीने शुक्रवारी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो म्हणाला होता, ‘आपला देश या क्षणी कठीण अवस्थेतून जात आहे. अधिकाधिक लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपल्या देशातील सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गेल्या एक वर्षापासून लोकांचे दु: ख पाहून मी आणि अनुष्का दुखावले आहोत.’
Comment here