आरोग्य

तुम्हाला जर शांत झोप हवी असेल तर करा हे खात्रीशीर उपाय

मित्रांनो, आज च्या या धावपळीच्या आयुष्यात ऑफिसमधील कामाचा ताण, अनियमित जेवणाच्या वेळा, कोणत्याही गोष्टींचा अति विचार करणे, इ. बाबींमुळे आपली रात्रीची झोप नीट होत नाही आणि मग दिवसभर आपली चिडचिड होते, कामात अजिबात लक्ष लागत नाही. खरंतर झोप ही एक नैसर्गिक क्रिया असून आपल्या सर्वांची प्राथमिक गरज आहे आणि झोप पूर्ण नाही झाली तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

तुम्हाला जर शांत झोप हवी असेल तर हे खात्रीशीर उपाय नक्की करून पहा आणि शांत झोपेचा आनंद घ्या :

. तुम्हाला जर झोप येतचं नसेल तर झोप येण्याची वाट पाहू नका. जर तुम्हाला २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोप आली नाही तर मग अशा वेळी एखाद पुस्तक वाचा किंवा संगीत ऐका. निवांत झोप येण्यासाठी तुम्ही योगासनेही करू शकता.

. तुम्ही रोज रात्री झोपण्याची व सकाळी उठण्याची वेळ ठरवून घ्या व ठरवलेल्या वेळेतच झोपणे व उठणे या क्रिया करा. ठरवलेल्या वेळांमध्ये जास्त बदल होऊ देऊ नका. १०-१५ मिनिटे थोडा फार फरक झालेला चालेल पण जास्त नको. तसेच महत्त्वाचे म्हणजे सुट्टी असली तरी सुद्धा ठरवलेली वेळ मोडू नका.

. रात्रीच्या जेवणावेळी तिखट मसालेदार व जड आहार घेऊ नका. असा आहार घेतल्यामुळे पचन नीट होत नाही व शांत झोप लागण्यास अडथळा निर्माण होतो. रात्रीचे जेवण व झोप यांमध्ये कमीत कमी २ तासांचे अंतर ठेवा.

. रात्री झोपताना कधीही चुकूनही चहा, कॉफी यांसारखी उत्तेजक पेये किंवा तंबाखू, सिगारेट आणि अल्कोहोल घेऊ नका. नाहीतर तुम्हाला झोप लागणारच नाही हे लक्षात ठेवा. कारण या सर्व गोष्टी तुमच्या मेंदूला उत्तेजित करतात व तुम्हाला जागे ठेवतात.

. झोपताना मोबाईल किंवा इतर गॅजेट्स चा वापर करू नका. या साधनांमधून येणारा प्रकाश हा थेट मेंदूवर परिणाम करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही.

. झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यास तुम्हाला फ्रेश आणि आरामदायी झोप येऊ शकते. तुम्ही खूप थकला असाल तर हात, पाय, चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा थकवा दूर होऊ शकतो. ताण आणि चिंता झोपताना दूर ठेवा.

. व्यायामामुळे तुम्हाला चांगली आणि शांत झोप लागू शकते व्यायामामुळे तुम्हाला ताणापासून सुट्टी मिळते.

. तुमची झोपण्याची खोली झोपण्यासाठी योग्य आहे ना, याची खातरजमा करा. फार प्रकाश खोलीमध्ये येणार नाही, याची काळजी घ्या. गडद रंगाचे पडदे आणि कमी प्रकाशाने खोलीमध्ये झोपेचे वातावरण तयार होईल.

. शांत झोपेसाठी अंथरूण व्यवस्थित आहे ना, याचीही काळजी घ्या. अनेकांना गादीवर शांत झोप लागत नाही, तर काही जणांना मऊ उशी हवी असते. तसेच गादी, उशी आणि पांघरूण स्वच्छ आहे ना हे ही पाहिलं पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here