आयपीएल २०२१ (IPL 2021) च्या चौथ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) चे संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकमेकांशी सामना करीत आहेत. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २२१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात पंजाबचा फलंदाज ख्रिस गेलने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे.
गेलने केला एक मोठा विक्रम
या सामन्यात ख्रिस गेलने ४० धावा केल्या. या खेळीदरम्यान गेलने २ षटकारही ठोकले. यासह गेल आयपीएलच्या इतिहासात ३५० षटकार पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. आयपीएलच्या इतिहासात गेलपेक्षा कुठल्याही खेळाडूचे जास्त षटकार नाहीत.
दुसर्या क्रमांकावरआरसीबीचा एबी डिव्हिलियर्स असून त्याच्या नावावर २३७ षटकार आहेत. तिसर्या क्रमांकावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असून त्याच्या नावावर २१६ षटकार आहेत. या सामन्यात गेल आपल्या अर्धशतकाच्या दिशेने जात होता तेव्हा रायन प्रयागच्या चेंडूवर बेन स्टोक्सने त्याचा झेल टिपला.
ख्रिस गेल च्या नावावर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक शतके आहेत. गेलच्या नावावर एकूण ६ शतके आहेत. दुसर्या क्रमांकावर आरसीबीचा कर्णधार विराट कोहली असून त्याच्या नावावर ५ शतके आहेत. तिसर्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याच्या नावावर ४ शतके आहेत.
पंजाबची मोठी धावसंख्या
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबच्या संघाने राजस्थानसमोर २२२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. पंजाबकडून त्यांचा कर्णधार केएल राहुलने ९१ धावांची शानदार खेळी खेळली. राहुलशिवाय दीपक हूडानेही ६४ आणि ख्रिस गेलने ४० धावांची खेळी केली. राजस्थानच्या सर्व गोलंदाजांनी धावांची लूट केली. पंजाबच्या संघाने त्यांच्या डावात एकूण १३ षटकार ठोकले. राजस्थानकडून चेतन साकारियाने पदार्पणामध्ये ३ गडी बाद केले.
Comment here